साहित्य:- १ मोठे वांगे, १ झुकिनी, ३ मध्यम टोमॅटो, २ मध्यम कांदे, लाल, पिवळी, हिरवी ढोबळी मिरची लहान असल्यास प्रत्येकी एक मोठी असल्यास प्रत्येकी अर्धी, लसणीच्या पाकळ्या २ ते ३, १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल,१ टीस्पून विनेगर किवा लिंबाचा रस, २ टेबलस्पून हर्ब्ज दे प्रोविन्स. रोझमेरी, बेसललिव्ज पावडर, ओरेगानो, फेनेल (बडिशेप), दालचिनी पावडर असं सगळंकिवा ह्यातलं जे मिळेल ते थोडं थोडं घेऊन साधारण २ टेबलस्पून होतील एवढं घेऊन एकत्र करा आणि त्यात एक तमालपत्र घाला. मीठ आणि मिरपूड चवीनुसार.
कृती:- सर्व भाज्यांचे चौकोनी मोठे तुकडे करा. लसूण बारीक चिरा. एका पसरट पॅन किवा कढई मध्ये ऑलिव ऑइल गरम करा. त्यात वांगे, झुकिनी व बेल पेपर्सचे तुकडे घाला व साधारण ५ मिनिटे परता. तुकडे गोल्डन व्हायला हवेत पण पूर्ण शिजायला नकोत, क्रंची हवेत. मग हे वेगळ्या वाडग्यामध्ये काढून ठेवा. आता पॅनमध्ये कांदा, लसूण आणि हर्ब्ज दे प्रोविन्स घाला,तमालपत्र घाला आणि कांदा गोल्डन होईपर्यंत परता. मग त्यात टोमॅटो घाला आणि २-३ मिनिटे परता.
आता ह्यात वाडग्यात काढून ठेवलेले वांगे+झुकिनी+बेलपेपर्स घाला. मीठ व मिरपूड घाला. लिंबाचा रस किवा विनेगार घाला. आता एअर फ्रायर २०० अंश से वर प्रिहिट करा. सर्व भाज्या व मसाले एकत्र केलेले बास्केट त्यात ठेवा. १० मि. एअर फ्राय करा. मग बास्केट बाहेर काढून भाज्या ढवळून घ्या थोडेसे ऑलिव्ह ऑइल ब्रश करा व परत ५ ते ६ मिनिटे एअर फ्राय करा. २ ते ३ मिनिटे फ्रायर मध्येच भाजी राहू द्या. नंतर सर्व्ह करा. गरम रटाटौलीचा अस्वाद भात, ब्रेड, न्यूड्ल्स तुम्हाला हवे असेल त्याबरोबर घ्या. एअर फ्रायर मधील रटाटौली मस्त क्रंची होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply