
साहित्य:- २ वाटी मैदा, २ वाटी बारीक रवा, २ वाटी तूप, १/२ वाटी दूध, २ वाटी बारीक साखर, वेलची पावडर.
कृती:- रवा आणि मैदा चाळणीने चाळून एकत्र करावा. आता २-३ चमचे गरम तूप आणि दुधाचे मोहन घालून एकत्र करून ५-६ तास किंवा रात्रभर तसाच झाकून ठेवावा. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण बारीक चाळणीवर चाळून घ्यावे. यालाच कणी पाडणे म्हणतात. कढईत तूप घालून गरम झाल्यावर चाळलेला रवा-मैदा तूप सुटेपर्यंत चांगला गुलाबीसर रंगावर भाजावा. थंड झाल्यावर हाताने चांगला बारीक करावा. त्यामध्ये बारीक बारीक गोळे नसावे. नंतर बारीक साखर, वेलची पावडर घालून एकत्र करावा. व लाडू वळावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply