साहित्य : ४-५ स्लाइस ब्रेड , ५-६ चमचे बारीक रवा , आधा कप मलई (फ्रेश क्रीम) , अर्धा चमाचा जीरे,एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,पाव चमचा लाल तिखट, बचकभार बारीक चिरलेली कोथिंबीर,चवीनुसार मीठ,सॅंडविचला लावण्यासाठी आमुळ बटर.
कृती : सॅंडविचचे टॉपिंग बनवण्यासाठी एका बाउलमध्ये रवा,मलई (फ्रेश क्रीम),बारीक चिरलेला कांदा,बारीक चिरलेला टोमॅटो,बारीक चिरलेली हिरवी मिरची,जिरे,लाल मिरचीचे तिखट,चिरलेली कोथिंबीर,आणि चवीनुसार मीठ घालून सगळे घटक पदार्थ ढवळून घेऊन चांगले मिक्स करून घ्या.
आता सॅंडविच बनवण्यासाठी ब्रेडचा एक स्लाइस घेऊन त्याच्या एका बाजूला दोन चमचे टॉपिंगचे मिश्रण लावा.अशाच प्रकारे ब्रेडच्या उरलेल्या सगळ्या स्लाईसेसना सुद्धा टॉपिंगचे मिश्रण लावून ठेवा.
आता गॅसवर एक नॉन-स्टिक तवा गरम करा. तवा गरम झाल्यावर त्याला अमूलचे बटर लावा. गरम तव्यावर ब्रेड स्लाइस टाकून माध्यम आंचेवर बटर लावून एक मिनिट भाजा. त्यानंतर कलथ्याच्या मदतीने खूप काळजीपूर्वक स्लाइस पलटी करा आणि दुसर्यान बाजूने बटर लावून भाजून घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply