
साहित्य – १ पेला हरभऱ्याची डाळ, तेल, फोडणीचं साहित्य, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, २ चमचे साखर, चवीपुरतं मीठ, लिंबू, नारळ.
कृती – हरभऱ्याची डाळ रात्री पाण्यात भिजत घालावी. सकाळी पाणी काढून मिक्सरवर खरबरीत वाटावी. वाटताना त्यात २-३ हिरव्या मिरच्या घालाव्या. मिश्रण कुकरच्या भांड्यात ठेवून कुकरच्या दोन तीन शिट्ट्या कराव्यात. डाळ बाहेर काढून ताटात पसरून हातानं मोकळी करावी. कढईत २ डाव तेल घेऊन मोहरी, जिरे, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात मोकळे केलेल्या वाटलेल्या डाळीचं मिश्रण घालावं. २ चमचे साखर, चवीपुरतं मीठ घालून मिश्रण थोडं परतावं. त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालावा. मिश्रण नीट हलवून घ्यावं. वरून कोथिंबीर आणि खोवलेला नारळ घालावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply