साबुदाणा वडा

साहित्यः

सव्वा कप भिजवलेला साबुदाणा,२ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे,२ ते ३ टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट,दीड टीस्पून लाल तिखट,दीड टीस्पून लिंबाचा रस,बारीक चिरलेली कोथिंबीर,चवीनुसार मीठ,तेल.

चटणीसाठी लागणारे साहित्य:

१/२ कप खवलेले ओले खोबरे,२ लहान हिरव्या मिरच्या,३ टेबलस्पून दही,१/२ कप कोथिंबीर.

कृतीः

प्रथम साबुदाणा भिजत घालावा. साबुदाणा भिजविण्यासाठी एका भांड्यात साबुदाणे घ्यावेत. साबुदाणे पूर्णपणे बुडतील इतके पाणी घालावे व लगेच पाणी निथळुन घ्यावे. अगदी थोडेसे पाणी शिल्लक ठेवावे व त्यावर झाकण ठेवावे. साधारण २ तासांनी त्यात लिंबाचा रस घालावा व पुन्हा झाकुन ठेवावे व साधारण १ ते दीड तास थांबावे. उकडलेला बटाटा किसून घेऊन त्यात भिजवलेला साबुदाणा घालून नीट एकजीव करून घ्यावे व त्यात शेंगदाण्याचे कूट, लाल तिखट, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण नीट एकजीव करून घ्यावे. तयार मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करावेत व त्यांना हलक्या हातानी दाबून चपटा आकार द्यावा व गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. चटणी तयार करण्यसाठी चटणीचे वरील दिलेले सर्व साहित्य मिक्सरमधून एकत्र फिरवून घ्यावे व गरमागरम वडे ओल्या खोबर्‍याच्या चटणीसोबत सर्व्ह करावेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*