पूर्वी तांदूळ कांडप सड देऊन त्याचा भरडा घरीच उखळात कांडला जाई. हाच भरडा सांजणीला वापरला जायचा.
साहित्य- १ वाटी तांदळाचा कणीदार भरडा, १ वाटीओल्या नारळाचं दूध, – १/२ वाटी साखर, केशर- ३/४ काडय़ा, एक वेलची, जायफळ पूड छोटा (चहाचा) चमचा, चवीपुरतं मीठ आणि काजू-बदामाचे काप.
कृती- तांदळाचा भरडा कढईत कोरडा भाजून घ्यावा व नारळाच्या दुधात भिजत घालावा. अध्र्या तासाने त्यात साखर, मीठ, वेलची, जायफळ पूड घालून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. अध्र्या तासानंतर हे मिश्रण तुपाचा हात लावलेल्या खोलगट थाळीत ओतावे. त्यावर काजूबदामाचे काप घालावे. एका मोठय़ा पातेल्यात पाणी उकळत ठेवून या थाळीतली सांजणी त्या वाफेवर शिजवून घ्यावी. ही गोड सांजणी थंड झाली की त्याचे चौकोनी काप पाडावे. आजच्या धकाधकीत कांडप काढणे कठीण आहे. मी हा पदार्थ थोडा बदल करून आजही करते.
१ वाटी इडलीचा जाडसर रवा (तांदळाचा), १ पॅकेट टेट्रापॅकमधलं नारळाचं दूध, उर्वरित साहित्य जसंच्या तसं आणि फक्त ढोकळा करण्याच्या ताटलीत तुपाचा हात लावून प्रेशर कुकरमध्ये शिटी न लावता उकडते.
– उज्ज्वला राजे, दहिसर, मुंबई.
Leave a Reply