साहित्य :- रवा १ वाटी, मैदा २ वाट्या, साखर पाऊण वाटी, काजू, बदाम पूड ४ चमचे, केशर, तेल, तूप, मीठ, दूध ४ वाट्या.
कृती:- प्रथम मैद्यामध्ये १ चिमूट मीठ व तेल घालून दुधामध्ये भिजवून घ्यावे. त्यानंतर मैदा थोड्या तुपात भाजून घ्यावा. दूध गरम करून त्यामध्ये साखर, बदाम पिस्त्याचा चुरा, केशर इत्यादी घालावे. नंतर यात रवा घालून एक वाफ येऊ द्यावी. हे मिश्रण थंड करून मैद्याच्या गोळ्यात पुरणाप्रमाणे भरून त्याच्या पोळ्या लाटाव्यात. साजूक तुपावर परतून खायला द्यावे. या पोळ्या दोन-तीन दिवससुद्धा टिकतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply