साहित्य : कांद्याचे वाटण २०० ग्रॅम (३०० ग्रॅम कांदे तेलावर परतून त्याची पेस्ट करा), आलं-लसूण पेस्ट- एक वाटी, लाल मिरच्या ८ ते १०, बडीशोप एक चमचा, मोठी वेलची ४ ते ५, छोटी वेलची ८ ते १०, स्टार फूल, दालचिनी २ ते ३, लवंग, जायपत्री १ चमचा, काळी मिरी २ चमचे, शहाजिरे २ चमचे, धणे अर्धी वाटी, खसखस पाव वाटी, ज्वारीचे पीठ २ चमचे, शेंगदाणा तेल एक वाटी, खोबरेल तेल १/२ वाटी, तिखट २ चमचे, तमालपत्र ४ ते ५, हळद एक चमचा, मीठ चवीनुसार.
कृती : कांदा व लसूण सोडून सर्व मसाले लालसर, काळपट रंगात भाजून घ्यावेत व गरम पाण्यात १० मिनिटे उकळल्यानंतर बारीक वाटून घ्यावे. पातेल्यात तेल टाकून प्रथम आले-लसूण पेस्ट टाकून ते शिजवल्यावर कांद्याचे वाटण तसेच वरील वाटलेला मसाला व तमालपत्र घालावे. थोडेसे पाणी टाकून हे मिश्रण तेल सुटेस्तोवर उकळावे. सगळ्यात शेवटी हळद, तिखट व खोबरेल तेल टाकावे. वरून थोडी कोिथबीर घालावी आणि चवीनुसार मीठ घालावे.
पाटोडी (पाटवडी)
साहित्य : सावजी ग्रेव्ही २ वाटय़ा, चण्याच्या डाळीचे पीठ एक वाटी, खोबऱ्याचा कीस २ चमचे, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, तेल २ चमचे, मोहरी, हिंग.
कृती : पाटोडीसाठी- थोडय़ा तेलात मोहरी फोडणीला घालून त्यात हिंग, हळद, तिखट, मीठ व एक वाटी पाणी घालून, बेसन घाला, ढवळत राहा. मिश्रण शिजवा. थोडे घट्ट झाल्यावर त्यात थोडी कोिथबीर घाला. नंतर हे मिश्रण ट्रेमध्ये घालून थापा. वरून थोडा खोबऱ्याचा कीस घाला. थंड झाल्यावर वडय़ा कापाव्यात. भाजी सव्र्ह करतेवेळी सावजी ग्रेव्हीला थोडे पातळ करून चवीनुसार मीठ घालावे. नंतर यात तयार पाटोडय़ा घालून एक उकळी आणावी.
Leave a Reply