साहित्य : १० लाल सुकया मिरच्या, १ टेस्पून लसूण एकदम बारीक चिरून, १/२ टेस्पून कॉर्न फ्लोअर किंवा कॉर्न स्टार्च, १ टेस्पून व्हिनेगर, साखर आणि मीठ चवीनुसार, ३ टेस्पून तेल.
कृती : १ कप पाणी चांगले उकळावे. त्यात सुकया मिरच्या तुकडे करून घालाव्यात. ३ ते ४ तासांनी किंवा मिरच्या नरम झाल्यावर त्यातले पाणी कढुन टाकावे. मिरच्यांची मिक्सरवर पेस्ट करावी. तेल गरम करावे. त्यात लसूण, आले मध्यम आचेवर परतून घ्यावे. मिरची पेस्ट घालावी.व्हिनेगर आणि कॉर्न फ्लोअर एकत्र करून घ्यावे. तेल सुटायला लागल्यावर त्यात व्हिनेगर-कॉर्न फ्लोअरचे मिश्रण आणि मीठ घालावे. चांगल्याप्रकारे परतावे. सगळ्यात शेवटी साखर घालावी.
Leave a Reply