साहित्य:- १ किलो गाजर, दीड पाव साखर, १/४ किलो खवा, १/२ वाटी साजूक तूप, वेलची पूड, सुकामेवा.
कृती:- गाजराची साल काढून, मधला पांढरा भाग काढून मोठ्या फोडी कराव्यात आणि कुकरमध्ये वाफवून घ्याव्यात. नंतर कुस्करून लगदा करावा. हा लगदा साजूक तुपात मंद आचेवर खूप परतून घ्यावा. बाजूने तूप सुटले पाहिजे. नंतर साखर घालून पुन्हा शिजवावे. शेवटी खवा घालून एकजीव करून शिजवून घ्यावे. वेलची पूड, केशर घालावे. डिशमध्ये काढल्यावर काजू-बदाम, पिस्त्यांचे काप व चारोळ्या घालून सजवावे. चांदीचा वर्ख लावावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply