
साहित्य:- 8 ब्रेड स्लाईस, दीड वाटी साखर, दूध आटवून बनवलेली घट्ट गोड रबडी दीड वाटी, दीड वाटी सुकामेवा आणि तळण्यासाठी साजूक तूप.
कृती:- ब्रेडच्या तुकड्यांच्या कडा कापून टाकाव्यात व मध्ये कापून एकाचे दोन त्रिकोनी तुकडे करावेत. हे तुकडे तुपात लालसर तळून घ्यावे. दीड वाटी साखरेत पाणी घालून एकतारी पाक करून घ्यावा. त्यात तळलेले ब्रेडचे तुकडे बुडवून लगेचच ताटात काढून घ्यावेत. जास्तीचा पाक निघून गेल्यावर ब्रेडचे तुकडे एका उथळ बशीत कलात्मक पद्धतीने मांडून त्यावर रबडी ओतावी. वर काजू – बदाम – पिस्ते यांचे काप घालून सजवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply