साहित्य : शेंगदाणे-1 वाटी, साखर – पाऊण वाटी, तूप- 1 चमचा, पाणी – अर्धी वाटी, वेलची पावडर – अर्धा चमचा, चांदीचा वर्ख.
कृती : प्रथम शेंगदाणे भाजून घ्यावे. साल काढून घ्यावीत. शेंगदाण्याचे बारीक कूट करावे. कढईत पाणी व साखर एकत्र करून बारीक गॅस वर ढवळत रहावे. असे बुडबुडे येतील. ढवळत राहावे. एकतारी पाक होत आल्यावर एक चमचा साजुक तूप घालावे. तूप मिक्स करावे. भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालून ढवळावे. गोळा होत आला की त्यात वेलची पावडर घालावी. तूप लावलेल्या ताटात हे मिश्रण ओतावे व थापून घ्यावे. वर्ख लावून छान वड्या कापाव्यात. वड्या तयार.
Leave a Reply