साहित्य:- शेवग्याची कोवळी पाने (साधारण एक जुडी होईल एवढा पाला), मुगाची डाळ अर्धी वाटी, कांदा एक, हिरव्या मिरच्या तीन-चार, लसूण पाकळ्या चार-पाच, तेल, चवीपुरतं मीठ, हिंग फोडणी साठी, ओलं खोबरं.
कृती:- मुग डाळ एक तास आधी धुवून भिजत ठेवावी व नंतर निथळून घ्यावी. शेवग्याची कोवळी पाने निवडून स्वच्छ धुवून घ्यावीत. नंतर बारीक चिरावित. एका कढईत तेल घेउन त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. कांदा बारीक चिरून फोडणीत घालावा व परतून घ्यावा. नंतर लसूण पाकळ्या, मिरची घालून परताव्यात. ते खमंग परतल्यावर त्यात डाळ घालावी व डाळ जराशी परतल्यावर त्यात चिरलेली भाजी घालावी मीठ घालून झाकण ठेवून मोकळी शिजू दयावी .
झाकण ठेवून वाफेवर शिजवावी. जरूर पडल्यासच पाणी घालावे. एक वाफ येउन गेल्यावर चविनूसार मीठ घालावे व पुन्हा परतून झाकण ठेवावे.. भाजी पूर्ण शिजल्यावर ओले खोबरे घालावे व भाजी गँसवरून उतरवून घ्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply