आपल्याकडे अनेकदा रात्रीच्या जेवणानंतर कधी चपात्या शिल्लक रहातात तर कधी भात आणि कधीतरी भाजीसुद्धा. या उरलेल्या अन्नाला थोडं नवीन रुप दिलं तर?
तसाही आता सगळीकडे रिसायकलींगचा बोलबाला आहेच. शिळ्या अन्नाचं रिसायकलींग करुन काही खास पाककृती कशा करता येतील ते बघूया !
शिळ्या चपात्यांपासून बनवलेलं हे थालिपीठ बनायला वेळ लागतो फक्त १५-२० मिनिटांचा.
साहित्य :
कुस्करलेल्या शिळ्या चपात्या – सहा
मोठा कांदा – एक
हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
एक बटाटा
दाण्याचे कूट
मीठ
तेल
कृती :
कांदा बारीक चिरुन घ्या. कोथिंबीर बारीक चिरुन घ्या. हिरव्या मिरच्या मिक्सरवर वाटून घ्या. बटाटा उकडून घ्या.
कुस्करलेल्या शिळ्या चपात्यांवर थोडे पाणी शिंपडून त्यांना नरम करा.
कुस्करलेल्या चपात्या, बारीक चिरलेला कांदा, उकडलेला बटाटा, वाटलेल्या मिरच्या, मीठ, दाण्याचे कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व एकत्र करुन मळून घ्या. बारीक गोळे करुन घ्या आणि थालिपीठे थापून घ्या.
तव्यावर तेल सोडून खरपूस थालीपीठे खरपूस होईपर्यंत भाजून घ्या.
गरम गरम थालीपीठावर तूप घालून दही किंवा टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करा. हवे असल्यास लोणचे किंवा कैरीचा चुंदाही सोबत घ्या.
Leave a Reply