साहित्य : एक पेला तांदूळ, अर्धा वाटी कापलेले सोडे, दोन पेले नारळाचे दूध, एक टीस्पून लसूण पेस्ट,तिखट,दोन मोठे कांदे,८ लवंगा,८ मिरे,दोन बडी वेलची, ४ हिरव्या वेलच्या,दोन काड्या दालचिनी,दोन तमालपत्र,एक टी स्पून शहाजिरे,हळद,चवीनुसार मीठ,चवीपुरती साखर,दोन पाकळ्या लसूण.
कृती ः प्रथम एक पेला तांदूळ धुऊन निथळत ठेवावे. मग अर्धी वाटी सोडे धुऊन त्याला हळद,मीठ,लसूण पेस्ट चोळून थोडा मसाला लावावा. धुतलेल्या तांदुळाला हळद,मीठ,तिखट आणि एक टी स्पून शहाजिरे चोळून ठेवावे.
ज्या भांड्यात खिचडी करायची आहे ते भांडे जाड बुडाचे असावे. भांडे गॅसवर ठेऊन त्यात एक डाव तेल किंवा तूप घालून त्यात आठ लवंगा,आठ मिरे,तमालपत्र, ४ हिरव्या वेलच्या घालून फोडणी करावी. मग त्यात मसाला लावलेले सोडे घालावे. सोडे चांगले परतावे व त्यात तांदूळ घालावेत. तांदूळ चांगले परतून झाले की उकळलेले नारळाचे दूध घालावे. भात तयार झाला की त्यात दोन लवंगा, दोन वेलच्या,दोन दालचिनी काड्या ह्यांची पावडर करुन घालावी. आणि चिरलेली कोथिंबीर घालून सोड्याची खिचडी सर्व्ह करावी.
Leave a Reply