
साहित्य :- तीन वाट्या सोया वड्या, अर्धी वाटी किसलेले बटाटे, अर्धी वाटी किसलेले गाजर, दोन चमचे आले-मिरची पेस्ट, तेल, एक चमचा गरम मसाला, एक वाटी मैदा, चवीनुसार मीठ.
कृती :- किसलेले गाजर व बटाटे नॉनस्टिक पॅनमध्ये परता. सोया मिक्सकरमधून काढून सर्व मसाले व मीठ घालून परता. बटाटे, गाजर व सोया एकत्र करून गोळा बनवा. मैद्यात थोडे तेल, मीठ व पाणी घालून भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्या. सोया मिश्रणाचे चपटे पॅटिस बनवून मैद्याच्या मिश्रणात बुडवून फ्रायपॅनमध्ये तेलात तळून घ्या. गरमगरम सॉसबरोबर सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply