साहित्यः- गव्हाचे पीठ – १५० ग्रॅम, सोयाबीन पीठ – १२५ ग्रॅम, ज्वारीचे पीठ – १०० ग्रॅम, बेसन – १२५ ग्रॅम, कांदा – 1 (मध्यम आकाराचा), कोथिंबीर, लसूण – ४-५ पाकळया, जिरे – १/२ चमचा, हळद – १/४ च. चमचा, तिखट – १ चमचा, मीठ – चवीपुरते, तेल.
कृतीः- सोयाबीन भाजून त्याची साल काढून पीठ करावे. कांदा, कोथिंबीर चिरून घ्यावे. सोयाबीन पीठ, ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ व बेसन सर्व पीठ एकत्र करावे. त्यात चिरलेला कांदा, कोथिंबीर, तिखट, मीठ, वाटलेला, लसूण, जिरे व हळद टाकून पीठ भिजवावे. तवा गरम करावा व त्यावर तेल टाकून पाण्याचा हाथ घेवून या पिठाचे गोल आकाराचे थालीपीठ थापावे तेल लावून भाजावे. दही सोबत सर्व्ह करावे
टिप :- थालीपीठाचे सारण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असू नये साधारणतः थालीपीठ थापता येईल एवढे असावे. ज्वारीचे पीठ नसल्यास गव्हाचे पीठ दुप्पट प्रमाणात वापरावे. सोयाबीन पीठ, ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ व बेसन सर्व पीठ एकत्र करावे व भाजून घ्यावे. अश्या पद्धतीने सुद्धा
थालीपीठाची भाजणी तयार करून महिन्याभर साठवून ठेवता येते व अवशक्तेनुसार वापरता येते.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
Leave a Reply