साहित्य:- सोयाबीन १०० ग्रॅम , ६ बारीक चिरलेले कांदे , अर्धी वाटी ओले खोबरे, गरम मसाला, आले-लसणाची पेस्ट, कोथिंबीर, हळद, २ टी स्पून तिखट, २ मोठे टोमेटो, जिरे, अर्धी वाटी तेल, मीठ.
कृती:- प्रथम सोयाबीन १५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावे. नंतर ते चांगले धुऊन त्यातून फेसाळ पाणी काढून घ्यावे. नंतर कुकर मध्ये थोडा पाणी टाकून त्यात धुतलेले सोयाबीन टाका आणि २ शिट्या काढून घ्या. २ शिट्या काढून झाल्यानंतर एका पातेल्यात सोयाबीन काढून घ्यावेत आणि ते पुन्हा पाण्याखाली धुऊन घ्यावेत. नंतर कुकरमध्ये १ छोटी अर्धी वाटी तेल फोडणीसाठी टाकावे. नंतर त्यात १ टी-स्पून जिरे, बारीक चिरलेले कांदे गुलाबी होयीपर्यंत परतून घ्यावे. त्यात आले-लसणाची पेस्ट, कांदा-खोबऱ्याचे वाटण, बारीक चिरलेले टोमेटो, हळद, चवीनुसार मीठ व २ टी-स्पून तिखट व धुतलेले सोयाबीन टाकून एकजीव होयीपर्यंत चांगले परतावे. मिश्रण एकजीव झाल्यावर एक मोठी वाटी पाणी टाकून २ शिट्या काढून घ्यावे. कुकर थंड झाल्यावर भाजी काढून त्यावर थोडी कोथिंबीर टाकून सर्व करावी.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
Leave a Reply