स्पंजी बेबी कॉर्न क्यूमब्ज

साहित्य :- एक कप बेबी कॉर्न, प्रत्येकी अर्धा कप तांदळाचे पीठ, बेसनपीठ व चिरलेली कोथिंबीर, दोन लहान चमचे आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, मीठ, पांढरे तीळ, एक लहान चमचा इनो फ्रूट सॉल्ट, तळण्यासाठी तेल.

कृती :- एका भांड्यात इनो फ्रूट सॉल्ट वगळता सर्व साहित्य मिसळा व पाणी घालून भजीप्रमाणे घट्ट मिश्रण तयार करा. एका डब्याला आतून तेल लावा व गरम करा. मिश्रणात इनो सॉल्ट घालून फेटा व डब्यात ओतून 8-10 मिनिटे वाफवून घ्या. त्यानंतर थंड करून त्याचे चौकोनी तुकडे कापून घ्या. एका कढईत तेल गरम करून हे तुकडे लालसर रंगावर तळा व चटणीसह गरमागरम सर्व्ह करा.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*