साहित्य :- चारशे ग्रॅम सुरण, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, दीड वाटी बेसन, एक चमचा तिखट, अर्धा चमचा जिरेपूड, एक चमचा गरम मसाला, दोन चमचे तेल मोहनासाठी, थोडी चिरलेली कोथिंबीर, चवीसाठी साखर, चिंचेचे लहान बुटुक, तळण्यासाठी तेल.
कृती :- सुरणाचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. त्यात चिंच घालून कुकरमधून उकडून घ्यावे. थंड झाल्यावर त्यातील पाणी व चिंच काढून टाकावी. उकडलेले सुरण हाताने मऊ करावे. त्यात वरील सर्व पदार्थ घालून कणकेसारखा गोळा मळावा. प्लॅस्टिकच्या कागदावर थापून चपटे वडे करावे व तळावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply