साहित्य – १ वाटी खोबऱ्याचा कीस, १ वाटी पिठी साखर, १ वाटी चारोळी, काजूचे तुकडे, बदाम काप, २ वाट्या मैदा, पाव वाटी तूप, तळण्यासाठी तेल, पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा वेलदोडा पावडर.
कृती – २ वाट्या मैद्यात पाव वाटी तुपाचं मोहन, पाव चमचा मीठ घालून मैदा दुधात घट्ट भिजवावा. तासभर झाकून ठेवावा. सारण करण्यासाठी खोबऱ्याचा कीस हलका भाजून घ्यावा. काजूचे तुकडे, बदाम काप, चारोळी थोडी भाजून घ्यावी. खोबऱ्याचा कीस, काजू बदामाचे काप, चारोळी, पिठी साखर, वेलदोडा पावडर एकत्र करून सारण तयार करावं. भिजवलेला मैदा कुटून मळून घ्यावा. त्याचे छोटे छोटे गोळे करून लहान पुऱ्या लाटाव्या. त्यात अर्धा चमचा सारण भरून कातण्यानं कडा कापाव्या. गॅस कमी जास्त करत करंज्या तेलात तळाव्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply