साहित्य:- २५० ग्रॅम बडिशेप (जाड किंवा देशी मिळाली तर उत्तम) ५० ग्रॅम सुके खोबरे किसून, ५० ग्रॅम ओवा (थोडा जास्त घेतला तरी चालेल), १०० ग्रॅम जेष्ठ्मध पावडर, ४ लवंगा, ४ वेलदोडे (सालासकट आख्खे वेलदोडे घ्यावेत), चमनबहार २ टी स्पून (‘चमनबहार’लाच रोझ पावडर म्हणतात.), मीठ १ चिमूट
कृती:- प्रथम कढई गरम करून त्यात किसलेले खोबरे थोडे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावे. फार लाल करू नये किंवा जास्त भाजू नये. ते खोबरे ताटात काढून त्याच कढईत बडिशेप भाजून घ्यावी. ती ही फार भाजू नये. फार कुरकुरीत करू नये. त्यातच आता ओवा, लवंगा आणि वेलदोडे घालून थोडे परतावे.
गॅस बंद करून त्याच कढईत पहिल्यांदा गरम केलेले खोबरे घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे.
हे सर्व मिश्रण पूर्ण गार होऊ द्यावे. हे गार झालेले मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यावे. थोडेसे भरडच ठेवावे, फार बारिक करू नये. एका मोठ्या भांड्यात हे मिश्रण काढून त्यात मीठ, चमनबहार आणि निम्मी जेष्ठ्मध पावडर घालून चांगले मिसळून घ्यावे. जर गोडीला कमी वाटले तर थोडी थोडी जेष्ठ्मध पावडर घालून चांगले मिसळून घ्यावे. सुपारीशिवाय सुपारी तयार आहे. ही हवाबंद डब्यात साठवावी.
टीप – चमनबहार हे सुवासासाठी वापरतात आणि त्याला साधारण पानमसाल्यासारखी चव असते. आपल्या आवडीप्रमाणे याचे प्रमाण वाढवले तरी चालते. पण खूप जास्त झाले तर थोडी कडवट चव लागू शकते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply