आजचा विषय सुरण

बाजारात गेल्यावर सार्याण भाज्यांमध्ये कुरूप, ओबडधोबड, अशी जर कोणती भाजी असेल तर ती आहे, सुरणाची! याचे वरील कवच जाड, खडबडीत आणि साधारण करड्या, तांबुस, तपकीरी रंगाचे असते. तर आतून मात्र सुरण गुलाबी, पिवळट असतो. एका सुरणाचे वजन जास्तीत जास्त ७० किलोपर्यंत असू शकते. सुरण दोन प्रकारचा असतो. एक खाजरा व दुसरा गोड. खाजरा सुरण खाल्ला असता हात, गळा या ठिकाणी खाज येते, सूज येते. त्याचा औषधात उपयोग होतो. सुरणाचे कंद १८ ते ३० सेमी व्यासाचे, मध्यभागी खोलगट असतात. याच्या कांडावर छत्री प्रमाणे पाने असतात. याचे झाड १-२ मीटर उंच वाढते झाडाला एप्रिल ते जून या महिन्यात फुले येतात व नंतर पाने येतात. वातहारक, पचन घडविणारे, कफ, सूज नाहिसे करणारे, रजोप्रवृत्तीवर्धक, बलकारक असे अनेक गुणधर्म सुरणाचे आहेत. मूळव्याध, यकृतरोग, आमवात, आतड्याचे रोग, संधीवात यामध्ये सुरण अतिशय औषधी आहे. यामध्ये भरपूर कर्बोदके, खनिजे, अ व ब जीवनसत्त्वे असतात. सुरणाचा वापर जपून करावा लागतो. सुरणामध्ये कॅल्शियम ऑक्झलेटचे स्फटिक असतात. ते टोकदार असल्याने ओठ, जीभ, घसा, अन्ननलिका या अवयवांना टोचतात त्यामुळे खूप खाज येते. म्हणून सुरण शिजवताना चिंच, आमसूल, आंबट पादार्थ वापरावे. म्हणजे त्यात कॅल्शियम ऑक्झलेटचे स्फटिक विरघळून जातील.सुरण संस्कृती भाषेत अशरेघ्न म्हणून ओळखला जातो. सुरणाची ताकातील भाजी मुळव्याध कमी करते, हे सर्वाना माहीत आहे. पण रक्त पडणाऱ्या मूळव्याधीत त्याचा उपयोग होत नाही. हे रक्ती मूळव्याधीच्या रुग्णांन लक्षात ठेवावे. सुरण उष्ण, शोथहर व पथ्यकर भाजी आहे. सुरणाचे खाजरे व गोड असे दोन प्रकार आहेत. खाजरा सुरण जास्त औषधी गुणाचा आहे. दणकट माणसांनी अधिक ताकदीकरिता तुपावर परतून सुरणाच्या चकत्या खाव्या. भूक मंद असताना, पचन ठीक होण्याकरिता, मूळव्याधीचा ठणका व सूज कमी होण्याकरिता सुरणाची ताकातील भाजी उत्तम गुण देते. मोडाचा आकार कमी होतो. सुरणाचे काप बनवतांना सुरण हे फिकट गुलाबी रंगाचे वापरावे. ते खाजरे नसते. फिकट गुलाबी रंगाचे म्हणजे सुरणाचा आतील गराचा भाग फिकट गुलाबी पाहिजे. सुरणाचे काप हे अगदी मटणाच्या कबाब सारखे लागतात.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

काही कृती सुरणाच्या
सुरणाचे वडे
सुरणाचे उपवासाचे दहीवडे
सुरणपाक टॉनिक
सुरणाचे काप
सुरणाचे कबाब
सुरणाची भाजी
सुरणाची भाजी
सुरणपाक
सुरणाचे कोट्टु
सुरणाची मसाला करी
सुरणाचे कटलेटस्
सुरण फ्राय
सुरण बिर्याणी
सुरणाचे लोणचे

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*