
साहित्य:- सुरणाचे पातळ तुकडे (1 वाटी), चिंचेचे बुटूक किंवा 1 आमसूल, मीठ, लाल तिखट, जिरेपूड व लिंबू रस चवीनुसार, 1 वाटी भाजणी, तेल.
कृती:- सुरणाचे तुकडे अर्धवट शिजवून घ्यावेत. शिजतानाच त्यात चिंचेचे बुटूक किंवा आमसूल घालावे. सुरणाचे तुकडे अर्धवट शिजले की पाणी काढून टाकावे. बाउलमध्ये मीठ, लाल तिखट, जिरेपूड, लिंबाचा रस एकत्र करून त्यात सुरणाचे तुकडे मिसळावेत. नंतर भाजणीमध्ये घोळवून घ्यावेत. तव्यावर थोडे तेल घालून सुरणाचे काप शॅलो फ्राय करावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply