
साहित्य :- अर्धा किलो पांढरा सुरण, (लाल अथवा गुलाबी सुरण खाजरा असतो), १ डावभर तेल, फोडणीचे साहित्य, चिंच, साखर चवीनुसार, १ चमचा लाल तिखट, ५-६ सुक्या लाल मिरच्या, १ चमचा उडदाची डाळ, थोडे किसलेले ओले खोबरे.
कृती :- सुरणाची सालं काढून सुरणाच्या लांबट पातळ फोडी कराव्यात. उकळत्या पाण्यात ३-४ आमसुले किंवा चिंच टाकून थोडे मीठ टाकून सुरणाच्या फोडी उकडून घ्याव्यात. १ डावभर तेलाची, कडीपत्ता, जिरे, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. फोडणीत लाल मिरची व उडदाची डाळ घालावी व उकडलेल्या सुरणाच्या फोडी घालाव्यात. किसलेलं ओलं खोबरं घालावे. लगेच मीठ व साखर घालावी. भाजी खरपूस परतून कोथंबीर घालून उतरवावी. यात चिंचेचा कोळ घातल्याने सुरणाची खाज निघून जाते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply