स्वीट कॉर्न सूप

साहित्य :- १ टिन स्वीट कॉर्न, २ मोठे चमचे कॉर्नफ्लावर, २ मोठे चमचे लोणी, १/२ छोटा चमचा अजीनोमोटो पावडर, १/२ कप पत्ता कोबी, १ गाजर, १ कांदा, २ चीज क्यूब.

पाककृती :- कोबी, गाजर व कांदा बारीक चिरुन घ्या. १/२ कप पाण्यात कॉर्नफ्लावर टाका. एका भांड्यात टिनमधील स्वीट कॉर्न, कॉर्नफ्लावर व ६ कप पाणी टाकून गॅसवर ठेवा. उकळी आल्यावर लोणी, अजीनोमोटो पावडर टाकून १० मिनीटे शिजवा. कांदा, गाजर, व कोबी टाकून ५ मिनीटे शिजवा गॅस बंद करून किसलेले चीज टाका. गरम-गरम वाढा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*