साहित्य : स्वीट कॉर्न – 1 कप, कणिक – 2 कप, हिरवी मिरची – 1 (बारीक चिरलेली), कोथिंबीर, मीठ – ½ चमचा किंवा चवीनुसार, काळी मिरची पावडर – ¼ चमचा, तेल किंवा तूप.
कृती : स्वीट कॉर्न पराठा बनविण्यासाठी, स्वीट कॉर्न च्या दाण्यांना कुकरमध्ये १५ मिनिटे मंद आचेवर उकडून घ्या. उकडलेल्या कॉर्न ला थंड होऊन देणे. थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक करुन घेणे. एका ताटात गव्हाचे पीठाचे कणिक मळून घेणे आणि त्यात बारीक केलेले स्वीटकॉनर्, मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करुन घेणे. थोडं थोडं पाणी घालून पराठ्यासाठी लागणारे कणिक मळून घेणे आणि १५ मिनिटे झाकून ठेवणे. तवा गरम करुन घेणे. मळून घेतलेल्या कनकेचे मिडीअम गोळे तयार करुन थोडेसे लाटून घेणे. आता त्यात तयार केलेले मिश्रण एकजीव करुन पराठा लाटून घेणे. पराठा तव्यावर ठेवून त्यावरून एक चमचा तेल किंवा तूप सोडून पराठा भाजून घेणे. दोन्ही बाजूंनी पराठा तयार झाल्यावर हिरवी चटणी, लोणचं किंवा दह्याबरोबर स्वीट कॉर्न पराठा सर्व्ह करणे.
Leave a Reply