१)मसाला कॉर्न आप्पे
साहित्य- स्वीटकॉर्न पेस्ट १ वाटी (स्वीटकॉर्न दाणे मिक्सर मधून काढून पेस्ट करणे किंवा अर्धवट बारीक केले तरी चालतील), १ वाटी बारीक रवा, १ वाटी ताक (दह्यात पाणी घालून घेतलं तरी चालेल), मीठ, आलं, जिरे, मिरची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा (आवडतीच्या भाज्या), सोडा किंवा इनो.
कृती- एका भांड्यात ताक घेऊन त्यात रवा घाला व नीट मिक्स करून घ्या. त्यात कॉर्न पेस्ट, आलं-जुरे-मिरची पेस्ट, मीठ, कांदा घालून एकसारखं हालवून घ्या. मिश्रण १० मी झाकून ठेवा. मिश्रणात सोडा किंवा इनो घालून हलवा आणि आप्पे पात्रात मिश्रण घालून झाकण ठेवून आप्पे दोन्ही बाजूनी भाजून घ्या. चटणी बरोबर सर्व्ह करा.
२)क्रिस्पी मसाला कॉर्न
साहित्य: कॉर्न १ कप, ७ ते ८ चमचे कॉर्नफ्लॉवर, ३ ते ४ चमचे मैदा, हळद, मीठ, पाणी, तळायला तेल.
मसाल्या साठी: कांदा बारीक चिरून, कोथिंबीर, लसूण बारीक चिरून, बारीक चिरलेली मिरची, तिखट थोडं.
कृती: एका पातेलीत पाणी उखलायला ठेऊन त्यात कॉर्न घालून ५ मी चांगले शिजवून घ्या. शिजलेले कॉर्न पाण्यातून काढून टॉवेल वर टाकून कोरडे करून घ्या. पातेलीत कोरडे कॉर्न घेऊन त्यावर ४ चमचे कॉर्नफ्लोवर व २ चमचे मैदा, मीठ व हळद घालून मळून घ्या. मळताना जोर लावून मळलं गेलं पाहिजे. जर दाणे एक मेकाला चिकटले असतील तर आजून थोडा मैदा आणि कॉर्नफ्लोवर घालून मळुन घ्या. आता दाणे वेगळे झाले असतील जर पीठ जास्त मोकळे झाले असेल तर तळताना पीठ तेलात जाईल म्हणून अगदी किंचित पाण्याचा शिपका मारून परत मळून घ्या. कढईत तेल गरम करून घ्या. तेल गरम झाले की त्यात दाणे टाकून मिडीयम फ्लेम वर ४ ते ५ मी तळून घ्या व टिशू पेपर वर दाणे काढून ठेवा. दाणे काढलेली २ मी चाळणीत ठेवा नाहीतर मऊ पडण्याची शक्यता असते. एका कढईत तेल हाय फ्लेम गरम करा त्यात कांदा, मिरची, लसूण , कोथिंबीर घालून चांगले परतून घ्या व शेवटी लिंबू किंवा विन्हेगर घालून हलवा. ग्यास बंद करून त्यात तळलेले दाणे घालून हलवा आणि डिश मध्ये काढून कोथिंबीर आणि शेव घालून सर्व्ह करा.
३)कॉर्न डोसा
साहित्य:- स्वीटकॉर्न १ कप, रवा २ कप, १ कांदा बारीक चिरलेला, आलं आणि मिरची बारीक चिरलेली, हळद, जिरे पूड, किथिंबीर, कडीपत्ता,
मीठ, २ टेबल स्पून तांदळाचं पीठ आणि तेवढीच कणिक, थोडं तेल, बडीशेप आवडत असेल तर
कृती:- स्वीटकॉर्न आणि रवा वेगवेगळा रात्रभर भिजत ठेवा. स्वीटकॉर्न मिक्सर मधून जाडसर भरडून घ्या. रव्यात कॉर्न मिश्रण मिक्स करा व वरीलसर्व साहित्य एकत्र करून नीट हलवून घ्या. अर्धा तास मिश्रण तसच ठेवा. त्यात थोडे पाणी घालून तव्यावर दोन्ही बाजूनी भाजून घ्या व चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.
४)कॉर्न प्याटीस
साहित्य: २ कप स्वीट कॉर्न, उकडलेले ३ मध्यम बटाटे, उकडलेले २ ब्रेडचे स्लाईस, १ टीस्पून आले, किसलेले ३ हिरव्या मिरच्या, पेस्ट करून
२ लहान कांदे, १/२ टीस्पून जिरे, १/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून, कॉर्न फ्लेक्स, क्रश केलेले १ टेस्पून मैदा + १/२ कप पाणी, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती: बटाटे सोलून कुस्करून घ्यावे. ब्रेडचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करावे आणि ते बटाट्यात घालावे. दीड कप कॉर्न मिक्सरमध्ये अगदी भरड वाटावेत. उरलेले १/२ कप कॉर्न अख्खेच मिक्स करावेत. कांदा बारीक चिरून घ्यावा. कॉर्नच्या मिश्रणात कुस्करलेले बटाटे, ब्रेडचा चुरा, मिरची पेस्ट, आले, जिरे, कोथिंबीर, चिरलेला कांदा, आणि मीठ घालावे. मिक्स करून घ्यावे. तयार मिश्रणाचे १८ ते २० मध्यम आकाराचे पॅटीस बनवावे. पॅटीस गोल आणि चपटे बनवावेत. क्रश केलेले कॉर्न फ्लेक्स एका ताटलीत पसरवून ठेवावे. मैदा आणि पाणी यांचे मिश्रण एकदा ढवळून घ्यावे. यात ३-४ पॅटीस बुडवून लगेच बाहेर काढावेत. आणि कॉर्न फ्लेक्सवर ठेवावेत. दोन्ही बाजूंनी कॉर्न फ्लेक्स चिकटतील याची काळजी घ्यावी. अशाप्रकारे सर्व पॅटीस बनवावेत. पॅटीस एकावर-एक रचू नयेत. सेपरेट ठेवावीत. अर्धा-पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवावे.
अर्ध्या तासाने पॅटीस फ्रीजमधून बाहेर काढून १० मिनिटे बाहेर ठेवावे. कढईत तेल गरम करून मिडीयम आचेवर पॅटीस तळून घ्यावी. जेव्हा पॅटीस तळणीत सोडाल तेव्हा २०-२५ सेकंद त्याला डिस्टर्ब करू नकात. एक बाजू थोडी तळली गेली की मगच झाऱ्याने बाजू बदलावी. दोन्ही बाजू सोनेरी रंगावर तळाव्यात. तळलेले पॅटीस टिश्यू पेपरवर काढावेत. पुदिना चटणी किंवा टॉमेटो केचपबरोबर सर्व्ह करावेत.
५)कॉर्न पकोडा
साहित्य: दीड कप मक्याचे दाणे, १/२ कप ज्वारीचे पीठ, ३ टेस्पून बेसन, २ टीस्पून हिरव्या मिरच्यांची पेस्ट, १ टीस्पून जिरे, १/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती: मक्याचे दाणे भरडसर वाटून घ्यावेत. (पेस्ट करू नये, फक्त अर्धवट मोडले जातील असे वाटावे.) भरडलेल्या दाण्यात ज्वारीचे पीठ, मिरच्यांची पेस्ट, जिरे, बेसन, कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करावे. लागल्यास थोडे पाणी घालून दाटसर पीठ भिजवावे. पीठ पातळ भिजवू नये, चिकटसर असे भिजवावे. तेल गरम करून आच मध्यम ठेवावी. चमच्याने लहान लहान गोळे तेलात घालून भजी तळून घ्यावी.
चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावी.
टीपा: जर मक्याचे दाणे जून असतील तर आधी थोडे वाफवून घ्यावेत. इतर पीठेसुद्धा वापरू शकतो. जसे तांदुळाचे, सोयाबीनचे पीठ. पीठाचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकतो. भजी तेलात सुटत असतील तर थोडे पीठ वाढवावे.
६)स्वीटकॉर्न सुप
साहित्य: २ कप स्वीट कॉर्नचे दाणे (कच्चे), १ टीस्पून बटर, २ ते ३ टेस्पून भोपळी मिरची मध्यम चिरून, २ ते ३ टेस्पून गाजर मध्यम चिरून, २ टेस्पून कोबी चिरून, १ टेस्पून कॉर्न फ्लोअर, १/४ टीस्पून पांढरी मिरपूड, चवीपुरते मीठ, २ टीस्पून साखर, पाती कांदा फक्त हिरवा भाग(सजावटीसाठी).
कृती:
१) स्वीट कॉर्न प्रेशर कुकरमध्ये ४ शिट्ट्या करून शिजवून घ्या.
२) २ पैकी दीड वाट्या स्वीट कॉर्न मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. बारीक भोकाच्या चाळणीवर गाळून घ्या.
३) कढई गरम करून त्यात बटर घालावे. भोपळी मिरची, गाजर, कोबी घालून मिनिटभर परतावे. आता गळलेली प्युरी आणि उरलेले १/२ कप अख्खे दाणे घालावे. तसेच साधारण अडीच पाणी घाला.
४) लहान वाटीत कॉर्न फ्लोअर आणि १/२ कप पाणी घालून मिश्रण तयार करावे. सूपला उकळी आली की त्यात दाटसरपणासाठी कॉर्न फ्लोअरचे मिश्रण घालावे.
५) मीठ, साखर आणि मिरपूड घालावी. मध्यम आचेवर मिनिटभर उकळी काढावी.
सूप सर्व्हिंग बोलमध्ये वाढावे. कांद्याची पात बारीक चिरून सजवावे. गरमच सर्व्ह करावे.
७)कॉर्न भेळ
साहित्य : २ कप मधु मका दाणे, १/४ कप कोथंबीर (चिरून), १ छोटा कांदा (बारीक चिरून), २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), १ छोटा टोमाटो (बारीक चिरून), १/४ टी स्पून मिरे पावडर, १/४ टी स्पून चाट मसाला, १ छोटे लिंबू रस, १ टे स्पून बटर, मीठ चवीने.
कृती : मक्याचे दाणे थोडे उकडून घ्यावे. (म्हणजे कुकर मध्ये एक शिट्टी काढावी). कांदा, टोमाटो, कोथंबीर बारीक चिरून घ्यावी. एका कढई मध्ये बटर गरम करून कांदा व हिरवी मिरची घालून थोडे गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. मग त्यामध्ये शिजवलेले मक्याचे दाणे, कोथंबीर, मीठ, लिंबू रस, मिरे पावडर, चाट मसाला, टोमाटो घालून मिक्स करून घ्यावे. गरम गरम सर्व्ह केले तर छान लागते. सर्व्ह करतांना मक्याच्या दाण्यावर कांदा, टोमाटोने सजवावे. वरतून मिरे पावडर, चाट मसाला भूर भुरावा.
८)बटर कॉर्न
साहित्य : मका, बटर, मीठ, साखर.
कृती:- मकेचे दाणे 5 मिन उकळुरन घ्याएक भांडयात काढून त्याला मीठ व साखर घालाव त्यावर थोडा बटर घाला
९)कॉर्न चाट
साहित्य:- १ स्वीट कॉर्न, २ चमचे बटर, १ चीझ क्युब, १ चमचा लाल तिखट, १ चमचा जिरं पूड, १ चमचा चाट मसाला, १ चिमूट हिंग, चवीनुसार मीठ.
कृती:- एका स्वीट कणिस चे दाणे काढून मिठ घालुन 5 मिनिटे उकळून घ्यावेसर्व पाणी निथळून एका बाउल मध्ये कॉर्न चे दाणे काढून गरम असतानाच त्यात बटर, किसलेले चीज, लाल तिखट, जिरे पूड, चाट मसाला, हिंग व मिठ घालून चांगले मिक्स कराझटपट कॉर्न चाट तयार.
१०)चीझ कॉर्न रोल
साहित्य: चीज १ वाटी, हिरवी चटणी २ टे. स्पून, काळीमिरी पूड १ टे. स्पून, साबुदाण्याचे पीठ १ वाटी, स्मॅश केलेला बटाटा १ वाटी, कॉर्न १ वाटी, मीठ चवीनुसार, तेल आवश्यकतेनुसार.
कृती: प्रथम एका बाऊलमध्ये कॉर्न, चीज, हिरवी चटणी, काळीमिरी पूड, चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करुन घ्या. उकडलेला बटाटा, साबुदाण्याचे पीठ आणि चवीपुरते मीठ घालुन मिश्रण मळुन घ्या. बटाट्याचे रोल करुन त्यात कॉर्नचे मिश्रण स्टफ करा आणि नंतर रोल पीठात घोळवून तळुन घ्या. अश्याप्रकारे चीज कॉर्न रोल तयार.
११)कॉर्न ऑन टोस्ट
साहित्य:- टोस्टसाठी दहा ब्रेड स्लाईस, थोडं बटर .
कॉर्न स्ट्यूसाठी :- तीन गावरान मक्याची कणसं, दोन-तीन हिरव्या मिरच्या, एक मोठा कांदा, दोन कप दुध, एक मोठा चमचा मिरपूड, अर्धा चमचा लोणी, चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ .
कृती :- कणसं सोलून किसणीवर किसून घ्यावीत. मिरच्या एकदम बारीक चिराव्या. कणसाच्या किसात दुध मिसळून कुकरमध्ये दोन शिट्टया कराव्यात. नॉनस्टीकच्या भांडयात लोणी तापवावं आणि त्यात चिरलेल्या मिरच्या घालाव्या. बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतावा. मग शिजलेलं दुध आणि कॉर्न घालून मीठ आणि मिरपूड घालावी. खाली उतरवल्यावर कोथिंबीर मिसळावी. वाढायच्या वेळी कॉर्न स्ट्यू परत गरम करावं. ब्रेडचे स्लाईस टोस्टरमधून भाजावेत. त्रिकोणी दोन तुकडे कापावेत. त्याला बटर लावून त्यावर गरम कॉर्न स्ट्यू पसरावं. टोमाटो सॉसबरोबर खायला दयावं.
१२)कॉर्न भाजी
साहित्य: १ कप व्हाईट कॉर्नचे दाणे, २ टेस्पून ताजा खोवलेला नारळ, २ लहान कोकमाचे तुकडे, १ टेस्पून गूळ किंवा साखर, २ टेस्पून कोथिंबीर, चवीपुरते मीठ.
फोडणीसाठी: २ टीस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १ चिमटी हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट.
कृती:
१) कॉर्न प्रेशर कुकरमध्ये २ ते ३ शिट्ट्या करून शिजवून घ्यावे. शिजवताना १/४ टीस्पून मीठ घालावे.
२) कढईत २ टीस्पून तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि नारळ घालावा. काही सेकंद परतावे.
३) शिजलेले कॉर्न घालावे. थोडे पाणी आणि कोकम घालावे. चव पाहून लागल्यास मीठ घालावे. झाकण ठेवून ५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे.
४) गूळ घालून २ मिनिटे उकळी काढावी.
हि उसळ पोळीबरोबर छान लागते.
टिप:
१) व्हाईट कॉर्न चवीला गोड नसतात. त्यामुळे साखर किंवा गूळ घालावा. तसेच कॉर्न कोवळे असतील तर कुकरची एकच शिट्टी करून कॉर्न शिजवावे.
१३)कॉर्न उसळ
साहित्य: चार कणसे, चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे, दोन चिरलेले कांदे, अर्धी वाटी ओले खोबरे, साखर, एक चमचा मीठ, हळद, मोहरी, हिंग, कढीपत्ता, तेल, चिरलेली कोथिंबीर.
कृती: कणसे कुकरमध्ये शिजवून नंतर किसणीवर किसून घ्यावीत.किसताना दाणे व दांड्यांचा कीस बाजूला ठेवावा.खोबरे व दाणे मिक्सरमधून वाटून घ्यावेत.तेलावर हिंग, मोहरीची फोडणी करावी. त्यात हळद, मिरच्या, कढीपत्ता व कांदा घालावा.कांदा गुलाबी झाल्यानंतर त्यात मक्याचा कीस घालावा.मीठ व साखर चवीनुसार घालून वरून कोथिंबीर घालावी.
१४)कॉर्न पनीर मटार कटलेट
साहित्य:- १कप कॉर्न, १कप मटार, १ कप किसलेले पनीर, ६/७ ब्रेड स्लाईज, एक मोठा बटाटा उकडुन घेतलेला, कोथिंबीर एक मोठा चमचा, चाट मसाला, गरम मसाला, मीर पुड, प्रत्येकी एक चमचा, आल लसुण हिरवी मिरची पेस्ट २चमचे ,कॉर्न फ्लॉवर एक ते दोन चमचे, थोडं तेल.
कृती :- मटार उकडुन घ्या , कॉर्न उकडुन घ्या. बटाटा उकडुन कीसुन घ्या.मटार आणि कॉर्न मिक्सर मधे फिरवून घ्या.हे सगळं एकत्र करून घ्या. ब्रेडला थोडं पाणी मरून कुस्करुन हे वरील मिश्रणात मिक्स करा.त्यात कोथिंबीर , आल लसुण पेस्ट, चाट मसाला, गरम मसाला, मीर पुड, मीठ किसलेले पनीर सगळं मिक्स करून मळून घ्या.मग हाताला थोडं पाणी लावुन त्या मिश्रणातला एक छोटा गोळा घेऊन हवा तो आकार दया.मग याला गरम तव्यावर थोडं तेल सोडुन दोन्ही बाजूंनी छान गुलाबी रंगावर भाजुन घ्या.सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करा.
१५)बेबीकॉर्न पकोडा
साहित्य: १५ बेबी कॉर्न, ३ टेस्पून कॉर्न फ्लोअर, १/४ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट, १/२ टिस्पून जिरेपूड, १/२ टिस्पून धणेपूड, १/४ टिस्पून आमचूर, चवीपुरते मिठ, तळणीसाठी तेल.
कृती:
१) बेबी कॉर्न धुवून साफ कपड्याने पुसून घ्यावी.
२) कॉर्न फ्लोअर एका लहान वाडग्यात घ्यावे. त्यात सर्व मसाले आणि मिठ घालून मिक्स करावे. या मिश्रणात २ ते ३ टेस्पून पाणी घालून मध्यमसर भिजवावे.
३) कढईत तेल तापवावे. तेल व्यवस्थित तापले कि आच मध्यम करावी.
४) कॉर्न फ्लोअरच्या मिश्रणात ३ ते ४ बेबी कॉर्न घोळवून घ्यावी. गरम तेलात तळावीत. सोनेरी रंग येईस्तोवर तळावी. अशा प्रकारे सर्व बेबी कॉर्न तळून घ्यावीत.
टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावीत.
१६)बेबीकॉर्न मनच्युरियन
साहित्य: २० बेबी कॉर्न, १/४ कप भोपळी मिरची उभे पातळ काप, १/४ कप कांदा उभे पातळ काप, ३ टेस्पून कॉर्न फ्लोअर, १ हिरवी मिरची बारीक चिरून, २ टीस्पून लसूण पेस्ट, १ टीस्पून आले पेस्ट, १ टीस्पून सॉय सॉस, १ टीस्पून व्हिनेगर, २ टीस्पून तेल + तळण्यासाठी तेल, चवीपुरते मीठ, २ टेस्पून पाती कांद्याची पात बारीक चिरून.
कृती:
१) एक लहान वाडगे घ्यावे. त्यात २ टेस्पून कॉर्न फ्लोअर आणि थोडेसे पाणी घालावे. पातळसर पेस्ट करावी. थोडेसे मीठ घालून मिक्स करावे.
२) बेबी कॉर्नचे १ इंचाचे तुकडे करावे. कॉर्न फ्लोअर पेस्टमध्ये हे तुकडे घालावे. तळणीसाठी तेल गरम करावे. त्यात बेबी कॉर्नचे तुकडे तळून घ्यावे.
३) मध्यम पॅन घेउन त्यात २ टीस्पून तेल गरम करावे. त्यात आलेलसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालावी. कांदा आणि भोपळी मिरची घालून दोनेक मिनिटे परतावे. १/४ कप पाणी, सॉय सॉस आणि थोडे मीठ घालावे
४) एका लहान वाटीत २ टेस्पून पाणी आणि १ टेस्पून कॉर्न फ्लोअर घालुन पेस्ट बनवावी. हि पेस्ट हळूहळू पॅनमध्ये घालावी आणि मिक्स करावे, गुठळ्या होवू देउ नयेत. यामुळे सॉस थोडा घट्ट होईल. आता तळलेले बेबी कॉर्न घालून मिक्स करावे. व्हिनेगर घालावे. बेबी कॉर्न सॉसने व्यवस्थित कोट झाले पाहिजेत.
बेबी कॉर्न मंचुरियन सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून पाती कांद्याने सजवावे आणि गरमच सर्व्ह करावे.
Leave a Reply