साहित्य- २ कप आंबट ताक, १ टेबलस्पून बेसन, ३-४ वाटय़ा पाणी (कढीचा स्वाद वाढविण्यासाठी थोडय़ा काकडीच्या चकत्या, शेवग्याच्या शेंगा, पिकलेल्या केळ्याचा गर इत्यादी घालतात.), चिरलेली कोथिंबीर, थोडे वाटलेले आले, मीठ, साखर, फोडणी, १ टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून, कुटून.
कृती- प्रथम सर्व साहित्य घालून कढी उकळून घ्या. मग हिंग, जिरे आणि मिरच्यांची फोडणी द्या. फार गोड ताक असल्यास कढी फुटते आणि चविष्ट लागत नाही. बदल म्हणून फोडणीत २ लवंगा, १ तुकडा दालचिनी घालता येईल. मेथी दाणे व थोडे धने, लाल मिरच्याही घालतात. कढीच्या फोडणीत हळद न घालता चिमूटभर हळद तशीच घाला, म्हणजे रंग चांगला येईल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply