
साहित्य : ५०० ग्रॅम चिकन, दोन टीस्पून लिंबाचा रस, एक टीस्पून (तेल वरून लावण्यासाठी) एक वाटी सायीचे घट्ट दही (चक्का), दोन टीस्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, एक टीस्पून गरम मसाला, एक टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून चाट मसाला, लाल रंग (पाहिजे असल्यास).
कृती : चिकनला खाचा पाडून मीठ व लिंबाचा रस चोळून ठेवा. घट्ट दह्य़ामध्ये आले, लसूण व मिरची पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, चाट मसाला आणि लाल रंग घालून फेटून घ्या. त्यात चिकनचे तुकडे ५-६ तास मॅरिनेट करा. पसरट काचेच्या प्लेटमध्ये चिकन ठेवा. १०० टक्के पॉवरवर ३-४ मिनिटे ठेवा. सुटलेला रस बाजूला काढून घ्या. चिकनला ब्रशने तेल लावा. परत १०० टक्के पॉवरवर तीन मिनिटे द्या. पाच मिनिटे बाहेर काढा. बाहेर गॅसवर चिकनचा रस्सा लावून २-३ मिनिटे भाजा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply