दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या टिप्स

स्वच्छ , सुंदर स्वयंपाकगृहात प्रसन्न मनाने बनवलेला स्वयंपाक आपल्याला उत्तम आरोग्य, तेज, कांती, ऊर्जा देतो. स्वयंपाक करणे ही एक कला आहे . या कलेमध्ये बरेच बारकावे आहेत. प्रत्येक गोष्टीला प्रमाणं आहेत. या प्रमाणांनुसार योग्य पद्धतीने स्वयंपाक केला तर पदार्थ उत्तम होतो .

चला तर मग दैनंदिन जीवनातील काही प्रमाणं व छोट्या छोट्या टिप्स पाहू.

१) एक वाटी कणिक = तीन पोळ्या
२) एक वाटी / एक मूठ पोहे = एक डिश पोहे
३) एक वाटी रवा + तीन वाट्या गरम पाणी = तीन डिश उपीट
४) एक वाटी शेवया + एक वाटी गरम पाणी = दोन डिश  उपमा
५)  एक वाटी तांदूळ + दोन वाट्या गरम पाणी = पुलाव /   जिरा राईस / मसाले भात
६) एक वाटी हरभरा डाळ + पाऊण वाटी गुळ  = पाच  पुरणपोळ्या होतात.
७)  एक वाटी बेसन + दोन वाट्या ताक = सुरळी वडी.
८) एक वाटी साबुदाणा + दीड वाटी शेंगदाणे कूट = तीन  डिश खिचडी .
९) कुठलीही पालेभाजी फोडणीत टाकल्यावर मंद आचेवर लगेच ताट झाकून वाफ द्यावी. पाच दहा सेकंदानी भाजी मऊ झाल्यावर मीठ टाकून परतावी.
१०) तेलाच्या किटलीतील तेल संपले की त्यातून कणिक फिरवून घेऊन किटली घासून टाकावी म्हणजे किटली तेलकट चिकट होत नाही.
११) १ लिटर दुध  = १ वाटी पनीर
पनीर करताना एक लिटर दुधाला उकळी आल्यावरच एका लिंबाचा रस गाळून टाकून दूध पूर्ण नासल्यावरच गॅस बंद करावा.
१२) पनीरच्या वड्या पडण्यासाठी त्यात एक चमचा कॉर्नफ्लोवर किंवा मैदा टाकून मळून घ्यावे व घट्ट बसेल अश्या डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवावे.
१३)  वरण/आमटी फोडणी टाकल्यावर मसाला व पाणी टाकल्यावर कढीपत्ता देठासकट टाकावा. छान चव येते.
१४) फ्लॉवर,वाटाण्याच्या भाजीला पावभाजी मसाला घालावा.
१५) शिळा भात उरला असेल तर फोडणीत कांद्यामध्ये पावभाजी मसाला टाकला की तवा पुलाव .
सोया सॉस,चिली सॉस टाकला की चायनीज राईस .
तेलात तमालपत्र,दालचिनी,जिरे टाकले की जिरा राईस
नेहमीच्या भजीच्या पिठात भात बारीक करून टाकला की भजी छान कुरकुरीत होतात.
शिळा भात  इडली डोश्याच्या पिठातही वाटून टाकता येतो.
१६) कुकरची शिट्टी होत नसेल तर  रिंग पाण्यात थोडा वेळ ठेवावी

किंवा

कुकरला झाकण लावून वाफ आल्यावर एक , दोन  मिनिटांनी शिट्टी लावावी. मग बघा कुकर कश्या शिट्ट्या मारतो.
१७) डाळ, भाताचा कुकर  झाला असेल तर झाकण थंड झाल्यावर डाळ बाजूला काढून शिळ्या पोळ्या कुकरमध्ये झाकण लावून ठेवाव्यात. अर्धा तास तरी पोळ्या नरम गरम लुसलुशीत होतात . वाफ अजिबात धरत नाही.
पोळ्याच नाही तर शिळा भात, भाकरी,पाव ,साबुदाण्याची खिचडी,उरलेल्या भाज्याही गरम होतात. मी स्वतः कित्येक वर्षे या पद्धतीने कुकरचा वापर करतेय.
त्यामुळे गॅसचीही बचत होते.
१८) अळूवडीसाठी प्रत्येक पानाला दोन चमचे पीठ घ्यावे.
१९) ओल्या खोबऱ्याच्या चटणीला दही नसेल तर एक लिंबू पिळावा .
२०) एका मध्यम आकाराच्या बटाट्यात दोन बटाटेवडे होतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*