साहित्य : टोफू किसलेले १ वाटी, बटाटा उकडलेला १ वाटी, आलं-लसूण पेस्ट २ चमचे, कॉर्नस्टार्च अर्धी वाटी, अजिनोमोटो १ चमचा, व्हिनेगर १ चमचा, टोमॅटो सॉस १ चमचा, सोया सॉस १ चमचा, तीळ ५ ते ६ चमचे, बारीक चिरलेला लसूण ४ चमचे, कोथिंबीर २ चमचे, तेल तळायला, सूप ८ ते १०, काळी मिरी पावडर अर्धा चमचा
कृती : सर्वप्रथम टोफू, बटाटा चवीनुसार मीठ, अर्धा चमचा अजिनोमोटो, आलं लसूण पेस्ट एकत्र करून व १ चमचा व्हिनेगार टाकून चांगले मळून घेणे सूप स्टिक घेऊन या मिश्रणाचा १ गोळा कॉर्नस्टार्चच्या साहाय्याने लॉलीपॉपप्रमाणे सूप स्टिकच्या टोकावर लावणे. वरून पुन्हा थोडे कॉर्नस्टार्च लावून याला डीपफ्राय करा. मंद आचेवर खरपूस तळलेले लॉलीपॉप एका ब शीत काढा. दुसऱ्या फ्राय पॅनवर १ चमचा तेल गरम झाल्यावर लसूण, तीळ, टोमॅटो सॉस, सोयासॉस, कोथिंबीर घालून त्यावर लगेच तयार केलेले लॉलीपॉप घाला. मोठय़ा गॅसवर परतून गरमागरम सव्र्ह करा.
टीप : लॉलीपॉप तळल्यानंतर लगेच फ्राय पॅनमध्ये सॉसेसबरोबर मिसळा. कुरकुरीत लागतील. या दोन प्रोसेसमधे जास्त वेळ नसावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply