साहित्य:- टोफू २५० ग्रॅम, दही घट्ट १ वाटी (नसल्यास दही कापडात बांधून पाणी काढून घेणे.), आलं लसूण पेस्ट २ चमचे, धणे-जिरे पावडर २ चमचे
तिखट, मीठ चवीनुसार, हळद, कस्तुरीमेथी चवीनुसार, चाटमसाला थोडा, तेल २ ते ३ चमचे, मैदा किंवा कणीक १ ते २ चमचे, सिमला मिरची, टोमॅटो, कांदे (मोठय़ा तुकडय़ांमध्ये)
कृती:- दह्यात सगळे मसाले कणीक घालून एकजीव करावे. नंतर त्यात टोकू शिमला मिरचीचे तुकडे टोमॅटो, कांदे घालावे. ३० ते ४० मिनिटे ते तसेच ठेवावे. नंतर एका सळईला प्रथम कांदा, मग टोकू – सिमला मिरची, टोमॅटो, परत टोकू या क्रमाने टोचून रुंद कोळश्याच्या भट्टीवर किंवा गॅसवर भाजून थोडा तेलाचा हात लावून चाटमसाला टाकून चटणी कचुंबरबरोबर सव्र्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply