
साहित्य:- २ मध्यम टॉमेटो, १०-१५ लसूण पाकळ्या, जाडसर चिरून, १/४ टिस्पून मिरपूड, १/२ ते १ टिस्पून विनेगर, २ टेस्पून तेल, १/४ टिस्पून हिंग, ६ कढीपत्ता पाने, ४-५ लाल सुक्या मिरच्या किंवा १ टिस्पून लाल तिखट, चवीपुरते मीठ.
कृती:- कढईत तेल गरम करावे. त्यात चिरलेली लसूण घालून गुलाबीसर परतावे. नंतर मोहोरी, हिंग, कढीपत्ता, आणि लाल मिरच्या घालून फोडणी तयार करावी. त्यात चिरलेले टॉमेटो आणि मीठ घालून टॉमेटोचा कच्चा वास जाईस्तोवर परतावे. टॉमेटो चांगले शिजले की आच बंद करावे. मिश्रण गार होवू द्यावे. त्यात व्हिनेगर आणि मिरपूड घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply