साहित्य:- २ वाट्या किसलेल्या टॉमेटोचा गर, १ वाटी नारळाचा खीस, २ वाट्या साखर, २ चमचे दूधाची पावडर, १ चमचा तूप.
कृती:- एका कढईत तूप, नारळ टाकून परतवून घ्यावे. त्यात टॉमेटोचा गर, साखर टाकून ढवळत रहावे. मिश्रण सुकं होत आलं की दूधाची पावडर टाकावी. बाजूने तूप सुटायला लागलं की गॅस बंद करावा. एका थाळीत तूप लावून त्यात मिश्रण टाकून वड्या कापून घ्याव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply