
साहित्य:
२-३ मध्यम आकाराची लाल रताळी
२ पेले गोड ताक
१/२ वाटी साखर
१ चमचा वेलची पावडर
थोडेसे केशर
१/२ चिमटी मीठ
कृती:
थोडेसे मीठ घालून रताळी कुकरमध्ये छान उकडून घ्यावीत. उकडलेली रताळी गार करुन, साल सोलून, हाताने कुस्करुन घ्यावीत. मिक्सरला कुस्करलेली रताळी, गोड ताक, साखर, वेलची पावडर, केशर, मीठ एकत्र करुन मिल्क शेक सारखे घट्ट पियुष करावे. गरज लागल्यास वरुन थोडी साखर घालावी. हे पियुष फ्रिजमध्ये थंड करुन मग प्यावे. उपवासासाठी झटकन होणारे व उत्तम असे हे पेय.
Leave a Reply