साहित्य : एक वाटीभर निवडलेली वरई, साखर पाऊण वाटी, अर्धी वाटी तूप, एक पिकलेले केळे, बेदाणे, चारोळ्या एक एक चमचा, थोडी जायफळ व वेलची पूड, चिमुटभर मीठ, दोन वाटी दूध.
कृती : वरई तांदूळ धुऊन चाळणीत घाला. पाणी निथळून जाईल. कढईत चमचाभर तूप गरम करा. त्यात तांदूळ लालसर रंगावर भाजा. दोन वाटी दूध चांगले तापवून वरईवर त्यातले एक वाटी भर ओता. थोडे मीठ टाका. चमच्याने हालवा. दाटसर होऊ लागल्यावर उरलेले एक वाटी दूध ओता. वरई शिजत आल्यावर साखर, चारोळ्या, वेलची, बेदाणे, जायफळ पूड टाका. परता. जरुरीप्रमाणे तूप घाला. केळ्याचे पातळ काप करा. त्यात टाका. पुन्हा ढवळून घ्या. एक वाफ आल्यावर भांडे खाली उतरा. गरम असताना खा. छान लागतो.
Leave a Reply