साहित्य – एक मध्यम आकाराचं भरिताचं वांगं, चिंचेचा कोळ, दीड ते दोन वाटया गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तेल, चवीपुरतं लाल तिखट, साखर, मीठ.
कृती – वांगं भाजून त्याची सालं आणि देठ काढून घ्यावा. भाजलेल्या वांग्यांचा गर मिक्सरमधून वाटून घ्यावा. त्यात चवीनुसार मीठ, तिखट, साखर, चमचाभर चिंचेचा कोळ आणि दोन चमचे गरम केलेलं तेलं घालावं. या मिश्रणात दीड ते दोन वाटया गव्हाचं पीठ घालून कणीक मळावी. पिठाचा गोळा तयार केल्यावर त्याचे छोटे-छोटे गोळे तयार करावेत. चपाती लाटतो त्याप्रमाणे गोळा लाटावा, फार पातळ लाटू नये. चपातीप्रमाणे दोन्ही बाजूंनी चांगला शेकून घ्यावा.
Leave a Reply