
साहित्य:- एक कप डाळीचे पीठ (बेसन), एक कांदा, अर्धी वाटी तळलेला कांदा, खोबऱ्याचे वाटण, मीठ, तिखट, गूळ, आमसुले, मोहरी, हिंग, हळद, मीठ, तिखट, दोन चमचे आले-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट (हिरवा मसाला).
कृती:- डाळीच्या पिठात चवीप्रमाणे हळद, तिखट, मीठ व आलेलसूणचे वाटण व दीड कप पाणी घालून भिजवा. गॅसवर कढईत ते मिश्रण घालून शिजवा. घट्ट झाले, की तेल लावलेल्या थाळीत थापा. त्याच्या वड्या पाडा. कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, हिंग, हळद, कांदा , तिखट, हिरवा मसाला व गरम मसाला घाला. तळलेला कांदा व खोबऱ्याचे वाटण घाला. पाणी घाला. आता त्यात मीठ, गूळ व आमसूल चवीप्रमाणे घाला. एक उकळी आली, की त्यात वड्या घाला. खायला देताना वर कोथिंबीर व साजूक तूप घाला.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
खतखते ची receipe try केली.खूप सुंदर.