साहित्य : १ मध्यम वांगे, १/२ कप तांदूळ पीठ, १ टेस्पून बेसन पीठ, २ टिस्पून लाल तिखट, १/४ टिस्पून हळद, चिमूटभर हिंग, १/२ टिस्पून जीरेपूड, १/२ टिस्पून धणेपूड, १/२ टिस्पून आमचूर पावडर (ऐच्छिक), चवीपुरते मीठ,
साधारण वाटीभर तेल.
कृती :
१) वांग्याच्या गोल चकत्या कराव्यात. ८-१० मिनिटे मिठाच्या पाण्यात भिजत ठेवावे.
२) पाण्याबाहेर काढून वांग्यावरील पाणी टिपून घ्यावे.
३) चणा पीठ, तांदूळ पीठ, हळद, तिखट, हिंग, मीठ, जीरेपूड, धणेपूड, आमचूर पावडर एकत्र करावे. (अजिबात पाणी घालू नये)
४) काप दोन्ही बाजूंनी वरील मिश्रणात घोळवून घ्यावे.
५) नॉन स्टिक तव्यावर २-३ चमचे तेल घालावे. आणि काप तव्यावर ठेवावे. मध्यम आचेवर वरुन झाकण ठेवून काप शिजू द्यावेत. बाजूने थोडे तेल सोडावे.
६) एक बाजू गोल्डन ब्राऊन झाल्यावर काप दुसर्या बाजूवर परतावे.
७) ३-४ मिनिटांनी सुरीने काप शिजले आहेत की नाही ते बघावे. जेवताना गरम गरम तोंडी लावणी म्हणून हे काप छान लागतात.
— मराठी पदार्थ व्हॉटसअॅप ग्रुप
Leave a Reply