
साहित्य : १ टोमॅटो, १ कांदा, ६ ते ७ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, थोडी कोथिंबीर, २ मिरच्या.
कृती : कुकर मध्ये २ चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, किंचि तिखट घालून त्यात टोमॅटो कांद्याचे वाटण घालणे व चांगले परतणे. मग त्यात अर्धा तास भिजवलेले, १ वाटी तांदूळ, २ वाट्या मिक्स पाच डाळी घालून परतणे. अर्धा चमचा गरम मसाला आणि १ चमचा धणे जिरे पावडर घालणे. मस्त ५ मिनिटे परतणे. त्यात दुप्पट पाणी घालून १ शिट्टी करून गॅस १० मिनिटे मंद आचेवर ठेवून मग बंद करणे. वरुन कोथिंबीर आणि खवलेला नारळ घालून गरम गरम खिचडी वाढणे.
Leave a Reply