साहित्य: मध्यम आकाराचे अर्धा किलो झिंगे (मोठी कोळंबी) स्वच्छ करून घ्या ( झिंगे सोलू नका त्यातील खरी टेस्ट आवरणात असत,फक्त पुढील टोक आणि दोरा कापून टाका ).
म्यारीनेट करण्यासाठी मसाला : ४ ते ५ चमचे स्पेशल आगरी कोळी मसाला , पाऊण चमचा हळद ,७ ते ८ लसणाच्या पाकळ्या ,१ इंच आल्याचा तुकडा ,३ ते ४ हिरव्या मिरच्या ,अर्धी खोबऱ्याची भाजलेली वाटी,१ मोठा भाजलेला कांदा , कोथिंबीर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या .(जितकं जास्त वाटण वापरणार तितकी जास्त ग्रेव्ही आणि टेस्ट सुद्धा )
पूर्व तयारी : झिंगे स्वच्छ धुवून घ्या त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि १ चमचा लिंबाचा रस टाका. आता तयार केलला म्यारीनेशन चा मसाला झिंगाना चांगल्या प्रकारे चोळून लावा . आणि अर्धा ते पाऊण तास फ्रीज मध्ये ठेवून द्या .
कृती : भांड्यामध्ये तेल गरम करून त्यात अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा आणि २ ते ३ कढीपत्त्याची पाने टाकून सोनेरी होईपर्यंत परतवून घ्या . आता यामध्ये म्यारीनेट केलेले झिंगे सर्व मिश्रणासकट टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या .( या मध्ये पाणी अजिबात टाकू नका ). भांड्यावर झाकण ठेऊन त्या झाकणावर अर्धा पेला पाणी टाकून ठेवा ५ ते १० मिनिटानंतर झाकणावरील पाणी भांड्यामध्ये सोडून द्या चांगल्या प्रकारे ढवळून अजून ५ मिनिटे मंद आचेवर ठेवा . झक्कास पैकी झिंगा मसाला तय्यार .
Leave a Reply