बोधकथा

जशास तसे उत्तर द्यायलाच लागते

जशास तसे उत्तर द्यायलाच लागते

शंकराचार्यांच्या आयुष्यात घडलेली ही कथा. शंकराचार्य तत्त्वज्ञानाचे मानवी आयुष्याशी असलेले महत्त्व समाजाला समजवून सांगताना सलताना अनेक उदाहरणे देत. आपल्याच आयुष्याकडे तटस्थवृत्तीने पाहिल्यास माणूस आयुष्यभर सुखाने जगू शकतो कारण आसपास घडणाऱ्या घटना ह्या मोह मायेतून घडत असतात. तेव्हा त्या किती अंगाला लावून घ्यायच्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सुख, दुःखासाठी किती काळजी करायची हे ज्याचे त्याने ठरवायचे ... >>>

भाषासौंदर्य

ती बाई मोठ्या हावरेपणाने सारे पाहत होती, सारे ऐकत होती, सारे समजून घेत होती. तिला वाटले आपल्यावर कुणी जादूचेटूक केले असावे. त्याविना हे इंद्रजाल दिवसाढवळ्या दिसणे शक्य नाही. दुनिया इतकी कशी बदलली ? तिला स्वतःमध्ये यत्किंचितदेखील फरक दिसत नव्हता. आणि आपण जिवंत आहोत याबद्दल तिची खात्री होती. ती अधिकच बावरली ... >>>

वचनामृत

देव ते संत देव ते संत ।  निमित्त त्या प्रतिमा । मी तो सांगतसे भाव । असो ठावे सकळा ।।
तुकाराम महाराज आपण संतांकडे कोणत्या भावाने पाहातात याची जाणीव करुन देतात. देवाच्या प्रतिमांची आपण देव समजून पूजा करतो, पण संत हे साक्षात देवच असतात.
— संत तुकाराम

Jokes

आज नुकतीच एक नवीन म्हण ऐकली…
  गल्लीत ओळखत नाही कुत्रं आणि फेसबुकवर पाच हजार मित्र…