माझ्या आजोबांनी ‘माझे सत्याचे प्रयोग’ या आत्मचरित्रात असे लिहिले आहे की, त्यांनी अहिसेची मूलतत्त्वे माझ्या आजीकडून शिकून घेतली. ती कधी आक्रमक नव्हती वा चूप बसून राहणारीही नव्हती. पण जे योग्य व न्याय्य आहे, ज्याच्याबद्दल तिची खात्री असेल त्याच्या बाजूने ती ठामपणे उभी राहायची. आजोबांचे काही चुकत असेल तर ती वितंडवाद घालीत नसे. शांत पण, अहिंसकपणे त्यांना सत्याची जाणीव करून देत असे. हाच अहिंसेचा खरा अर्क होता, असे आजोबा म्हणत.
– अरुण गांधी (कस्तुरबा) अनु. – अरुण शौरी