दीस कलतीला लागल्यावर मालक मळ्याकडं नारोळ-निवद घेऊन आला. त्येच्याबरोबर कोल्हापूरचा गेलं साली आलेला पाव्हणा…त्येच्याबी पल्याडल्या साली आला हुता. उच्चच्या उच्च. त्येची सावली माळावर लांबतोपर गेलेली. अजून तसाच नाळ-रोगी. व्हटांवरच्या मिशा काढलेला. भुंडा. पायांत पट्टयापट्टयांचं कसलं तरी चप्पल. हातपाय बारक्या पोरागत बिनकामानं मऊमऊ दिसतेलं. चुन्यात बुडीवल्यागत पांढरीधोट कापडं…पांढर्या कापडांस्नी बघून जनावरं भुजली नि समदी दावणच्या दावण कावरीबावरी होऊन हुबी र्हायली.
– आनंद यादव
Leave a Reply