अनूला काळाचा एक सुप्त प्रवाह जाणवतो. त्या गावापासून तिच्यापर्यंत. त्या सगळ्या माणसांपासून तिच्यापर्यंत. मूलबाळ नसलेल्या त्या स्त्रीपासून तिच्यापर्यंत. त्या स्त्रीला स्वतःचं नाव नाही, स्वतःचा म्हणून चेहरा नाही. तिच्या मूल नसण्यानंच हे सगळं गिळून टाकलं आहे. तिची मग दुसरी कुठली ओळख उरली नाही. तिची तिनंच ती ठेवली नाही. स्त्रीचं तर तेच मर्माचं ठिकाण मानलेलं ! तिनंही त्याला मान तुकवली. तिच्याकरताच म्हणून ठेवलेल्या त्या मर्माला…त्याच्या बाजूनं निघून जाण्याचा साधा प्रयत्नही केला नाही.
— आशा बगे (पाऊलवाटेवरले गाव)
Leave a Reply