मुलानंच पसंत केलेल्या, घरात येणार्या सुविद्य मुलीची ही चाचणी … मैथिली अस्वस्थ आणि काहीसा मिलिदही…. मिलिदचं ते देखणं, आधुनिक अद्ययावत घर… आत्या म्हणाली म्हणून ती मिलिदच्या आई-बाबांच्या पाया पडली. उगाचच बोलणं सुरू राहिलं. ते बोलणं नसावंच. नोकरीचा अर्ज भरलेल्या उमेदवाराचा जसा काही इंटरव्ह्यूच. तिच्याबद्दल सगळं माहीत होतं तरी तेच प्रश्न. मग कीर्तीच्या लग्नाचा विषय सापडला. त्यावर मिलिदचे वडील खुलून बोलले. मधेमधे त्यांना पुष्कळसे फोनही आले. काही त्यांनीही केले. कीर्ती तिला हळूच ‘‘चल तिकडे’’ म्हणाली, तेव्हा मैथिलीला हायसं झालं. मिलिद या वेळी मैथिलीशी नेहमीसारखा मोकळेपणानं बोलू शकला नाही.
– आशा बगे (भूमी)