डोळे भरून आले. काय होणार या बाईचं ? काय काम करू शकेल ती आता उजवाच हात गेल्यावर ? चार चार मुली आहेत. पण बघेल का त्यातली एखादीतरी जबाबदारीनं तिच्याकडे ? का केलं जयाबाईच्या नवर्यानं असं ? तिनं पुढारीपणा करावा हे त्याला आवडत नव्हतं का ? किवा त्याचेही अहंकार असतीलच. सरपंचाला सुनावू शकणारी, तहसीलदाराला जाऊन भेटणारी बाई कदाचित घरातही वरचढ ठरत असेल…ते सोसत नसेल त्याला. नाहीतर आता त्यानं असं करण्याचं दुसरं कारण काय असू शकणार ?
– कविता महाजन (ब्र)
Leave a Reply