नंतर ज्योतिषीबुवांनी पाटीवर कुंडली मांडली व त्यावर हळदीकुंकू वाहिले. ‘‘यावर दक्षिणा ठेव- पुरेल, रुपया-नाही तर अधेली-पावली, चवली काहीही. काय पैसा ? एक पैसा ? तरी हरकत नाही, माझं काही त्या रामेश्वरी ज्योतिषीबुवांसारखं नाही. माझं कसचं. दोवाचं. मनोभावानं ठेवलेला पैसा बळजबरीच्या मोहोरेहून देवाला अधिक आहे. ठीक. बाधा आहे – शनीची बाधा आहे; पण लवकरच सुटणार आहे. आठ आणे दक्षणा दिली पाहिजे. म्हणजे शनीचा कोप कमी होईल. आता पुढच्या भविष्याविषयी म्हणशील, तर बरं, जरा तुझं मुंडासं या पाटीवर पांघरूण घाल पाहू. कारण झाल्या गेल्या गोष्टी उघड दिसत नसल्यामुळे त्यावर वस्त्र झाकून त्या पहाव्या लागतात.’’
– कॅप्टन गो. ग. लिमये (विठूचे भविष्य)
Leave a Reply