आपल्यापैकी काही जण अशा प्रसंगातून स्वतःला नियमितपणे नेत असतात असे म्हटलं, तर कदाचित आश्चर्य वाटेल. आपल्या पंधरा वर्षांच्या मुलाच्या वर्तणुकीबद्दल आणि त्याच्या समस्यांबद्दल माझ्याशी बोलताना एका आईचा चेहरा पाणवला आणि ती म्हणाली, ‘‘लहानपणी त्याला अंगावरचं दूध नाही देऊ शकले, म्हणून हे सगळं असं झालं.’’ तिच्या चेहर्याकडे पाहून माझी खात्री झाली, की हा विचार तिला प्रत्येक वेळी प्रचंड ताकदीने कुरतडत असेल. मुलाच्या संदर्भात येणारी प्रत्येक कटू आठवण तिला तोफेच्या तोंडी देऊन जात असेल. मुलाच्या वागण्याची, तिच्या मनातली जी अगदी वैयक्तिक आणि खासगी कारणमीमांसा आहे, त्यात दष मुलाचा नसतो, तर ही आई म्हणते, स्वतःचाच आहे.
— डॉ. आनंद नाडकर्णी (स्वभाव-विभाव)
Leave a Reply